सोयगाव । सोयगाव शहरातील मुख्य रस्त्यावरून वाहतुकीची मोठी कोंडी झाल्याने मंगळवारी 29 रोजी वाहनधारकांना वाहन बाहेर काढण्यासाठी मुख्य रस्त्यावर तासनतास खोळंबावे लागल्याने सोयगावला मोठी फजिता झाली होती. महालक्ष्मी आगमनाची खरेदीची लगभग, त्यातच शेतकर्यांचे कर्जमाफीचे अर्ज भरण्याची शेतकर्यांची वाढलेली शहरातील वाढती गर्दी पाहता आठवडे बाजाराच्या दिवशी शहरातील वाहतुकीची वर्दळ वाढली होती. परंतु शहराच्या मुख्य रस्त्यावर लागलेल्या वाहनांच्या दुतर्फा रांगा आणि या वाढलेल्या रांगांतून वाहनधारकांना वाहने काढण्यासाठी मोठी कसरत करावी लागली आहे. शहरात विक्रमी गर्दी झाली होती. परंतु वाहतूक पोलिसांच्या वतीने शहरातील वाहतुकीची शिस्त न लावली गेल्याने शहरात वाहतुकीचे तीनतेरा झाले होते.सोयगावच्या बसस्थानकावर वाहतूक विस्कळीत झाल्याने प्रवाशांची मोठी धावपळ उडाली होती. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना बसेस पकडण्यासाठी धावत बसेस पकडाव्या लागल्या.
पावसाने संकटात वाढ
सोयगाव शहरात झालेली वाहतुकीची कोंडी आणि त्यातच झालेला संततधार पावसामुळे आणखीनच संकटात भर पाडली होती.पावसाचे वाढलेले शिपके आणि वाहतुकीची कोंडी यामुळे शहरात आलेले नागरिक मोठे हवालदिल झाले होते.