अक्कलकुवा । अक्कलकुवा तालुक्यातील सोरापाडा ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी शिवसेनेच्या ताराबाई तडवी यांची बिनविरोध निवड झाल्यामुळे नंदुरबार जिल्हा शिवसेनाप्रमुख आमश्या पाडवी यांनी नवनिर्वाचित सरपंच व उपसरपंचाचे अभिनंदन केले. सोरापाडा ग्रामपंचायतीसाठी झालेली निवडणूक याआधीच बिनविरोध झालेली होती. याठिकाणी शिवसेनेचे लोकनियुक्त सरपंच छोटुलाल पाडवी सह संपुर्ण नऊ पॅनल बिनविरोध झाले होते आज दिनांक 25रोजी उपसरपंच पदाच्या निवडीसाठी येथील ग्रामपंचायतीच्या कार्यालयात निवडणुक निर्णय अधिकारी डि. एम चौरे यांच्या अध्यक्षतेखाली निवडणुक प्रक्रिया संपन्न झाली त्यात शिवसेनेच्या ताराबाई भिमसिंग तडवी यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्यामुळे त्या बिनविरोध घोषित करण्यात आल्या यावेळी ग्रा.पं.सदस्य संतोष पाटिल, गोविंद तडवी, शारदा पाडवी, मंगला बिर्हाडे, ज्योती पेढारकर, सुनिता तडवी, महेश तडवी, अमरसिंग वळवी आदि उपस्थित होते. सदर बिनविरोध झाल्यामुळे शिवसेना नंदुरबार जिल्हा प्रमुख आमश्या पाडवी जिल्हाप्रसिध्दि प्रमुख नवरतन टाक, ललित जाट, मोहन वसावे, रावेंद्र चंदेल, संगिता पंजराळे, राणीमॉ साहेब, गणेश माळी, लाला पठाण, राजेंद्र पाडवी, पृथ्विराज पेंढारकर, सरलाल बिर्हाडे, ईश्वर पाडवी, सुनिल पाडवी, भाईदास सामुद्रे आदिंनी नवनियुक्त सरपंचासह सदस्यांचे अभिनंदन केले.