सोलर कंपनीला बनावट कागदपत्राद्वारे शेत विक्री

0

चाळीसगाव । तालुक्यातील बहुचर्चित असलेल्या न्यु रिन्युवेबल सोलर कंपनीला मयत महिलांच्या जागेवर दुसर्‍या महिला उभ्या करुन बोढरे शिवारातील 19 एकर जमिन खरेदी खत करुन देणार्‍या 14 जणांविरोधात चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याबाबत माहिती अशी तालुक्यातील बोढरे येथील भीमराव सखाराम साबळे (60) यांच्या वडिलोपार्जित हिश्याची बोढरे शिवारातील शेत गट नं. 44 मधील क्षेत्र 7 हेक्टर 90 आर म्हणजे जवळपास 19 एकर शेत जमीन वारस शेनपडाबाई राघो साबळे व शामबाई नामदेव जाधव या मयत झाल्या असतांना देखील त्यांच्या जागेवर बनावट ओळखपत्र तयार करुन त्यांच्या नावाने आरोपी इंदुबाई राजाराम साबळे, जिजाबाई दत्तु साबळे रा. बोढरे ता. चाळीसगाव यांनी व आरोपी महेंद्र राजाराम साबळे, काकाजी राजाराम साबळे, कांताबाई राजाराम साबळे, दत्तु राघो साबळे, सिंधुबाई राघो साबळे, गोकुळ देवराम साबळे, सत्यभामा देवराम साबळे, मैनाबाई रतन वाघ, गुलाब बाबु राठोड, तुळशीराम चैनसिंग राठोड सर्व रा. बोढरे ता. चाळीसगाव व पुंजाराम रामा धुमाळ (रा. शेंदुर्णी ता. मालेगाव जिल्हा नाशिक) धनंजय नारायणराव देशमुख रा चाळीसगाव यांनी संगनमत करुन 19 एप्रिल 2017 रोजी सायंकाळी 4 ते 5 वाजेच्या सुमारास चाळीसगाव शहरातील रेल्वे स्टेशन स्थित दुय्यम निबंधक कार्यालयात मे रिन्युवेबल सोलर कंपनीतर्फे संजय पांडुरंग रहाटे यांना बनावट खरेदीखत करुन देवुन भिमराव साबळे यांची फसवणुक केल्याप्रकरणी वरील 14 आरोपींविरोधात चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनला गुरनं 36/2018 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोउनि राजेश घोळवे करीत आहेत.