नवी दिल्ली-राष्ट्रपति राम नाथ कोविंद २७ जूनला ‘सोलर चरखा मिशन’ची सुरुवात करणार आहे. या मिशन अंतर्गत ५० क्लस्टरला दोन वर्षाकरिता ५५० कोटींची सबसिडी दिली जाणार आहे. माइक्रो, स्मॉल आणि मीडियम एंटरप्राइजेज (एमएसएमई) मिनिस्टर गिरिराज सिंह यांनी ही माहिती दिली. सिंह यांनी सांगितले आहे की, जवळपास ५ कोटी महिलांना या योजनेशी जोडण्यात येणार आहे. त्याव्यतिरिक्त सेल्फ हेल्प ग्रुपला देखील या योजनेशी जोडले जाणार आहे.
दरम्यान या योजनेंतर्गत दोन वर्षात जवळपास १ लाख नोकऱ्या उपलब्ध होणार आहे असे एमएसएमईचे सचिव ए.के. पांडा यांनी सांगितले आहे. सरकार जवळपास ५५० कोटींची सबसिडी देणार आहे. ५० क्लस्टरला ही सबसिडी मिळणार आहे. एका क्लस्टरमध्ये ४०० ते २००० हजार लोकांचा सहभाग असणार आहे.