सोलर पॅनल व डिजिटल शाळेचे उदघाटन

0

निजामपूर । साक्री तालुक्यातील माळमाथा परिसरातील वासदरे जिल्हा परिषद मराठी शाळेतील सोलर पॅनल व डिजीटल वर्गाचे उदघाटन महाराष्ट्र राज्य शिक्षण संचालक डॉ सुनिल मगरे यांच्या हस्ते झाले. अध्यक्ष प्राची साठे, हे होते. यावेळी सिध्देस वाडकर, मोहने देसले, विद्या पाटील, बी. बी. भील, उत्पल नांद्रे, हर्षल विभाडीक, शरदभाई शाह, उषा ठाकरे, वासुदेव वाणी, विशाल बागुल, ताहीरबेग मिरजा, युसूफ सैयद, नंदकुमार विसपुते, श्री.पगारे, शोभा देसले, सरपंच सुमनबाई सोनकर, काशीनाथ सोनकर, प्रकाश बच्छाव, एकनाथ पिसाळ. सागर ठेलारी, विलास पाटिल आदी उपस्थितीत होते.

गुणवत्ता वाढीसाठी मित्रा अ‍ॅप
सुनिल मगरे यांनी पुढे सांगितले की, शिक्षणाचा दर्जा चांगला व्हावा यासाठी लोकांनी सहभागी होऊन शिक्षणासाठी मदत करावी गावात एकही मुलगा शिक्षणापासुन वंचित राहणार नाही याची काळजी गावकर्‍यांनी घ्यावी. शिक्षणाचा प्रसार प्रचार व्हावा यासाठी मित्रा अँप्स सुरू केले आहे. 100% गुणवत्ता वाढवावी याउदेशाने अँप सुरु केले आहे. शासनाने शिक्षणाकडे विशेष लक्ष दिले आहे यासाठी लोकांनी सहभागी होऊन शैक्षणिक कामात मदत करावी असे आवाहन केले आहे. यशस्वीतेसाठी मुख्याध्यापाक राजेंद्र देसले, शिक्षक पावबा बच्छाव, आफ्रीन पठाण, बंडू मोरे, मनिष वसावे, रविंद्र पवार, बाई पवार आदीनी घेतले. सुत्रसंचालन पावबा बच्छाव आभार विद्या पाटील यांनी व्यक्त केले.