सोलापूरजवळ शिवशाही बसचा अपघात

0

सोलापूर– पुण्याहून सोलापूरकडे जाताना शेटफळ फाट्याजवळ शिवशाही बसला भीषण अपघात झाला. या अपघातात एका प्रवाशाचा जागीच मृत्यू झाला तर 16 जण जखमी आहेत. मल्लिकार्जुन आबुसे असे मृत प्रवाशाचे नाव आहे. ही दुर्घटना पहाटे 4 वाजता घडली. वाहनचालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे बस धडकली. ही धडक इतकी भीषण होती की, बसच्या पुढील भागाचा चक्काचुर झाला. जखमींवर सोलापूर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहे. दरम्यान, एसटी प्रशासनातर्फे जखमींना प्रत्येकी 1 हजार, तर मयत मल्लिकार्जुन आंबुसे यांच्या कुटुंबीयांना 10 हजार रुपयांची मदत देण्यात आली आहे.