सोलापूरसह आग्रा हत्याकांडाचा भुसावळात निषेध

0

भुसावळ तालुका वकील संघातर्फे प्रांताधिकारी प्रशासनाला निवेदन

भुसावळ- सोलापूर येथील अ‍ॅड.राजेश कांबळे यांचे अपहरण करून खून झाल्याचा तसेच उत्तरप्रदेशातील आग्रा येथील दरवेश यादव या महिलेचा हत्या झाल्याचा भुसावळ तालुका वकील संघाने निषेध करीत प्रांताधिकारी प्रशासनाला दोषींवर कारवाईसाठी शुक्रवारी निवेदन दिले.

दोषी आरोपींवर कठोर शासनाची मागणी
सोलापूरचे अ‍ॅड.राजेश कांबळे हे बेपत्ता असल्याची तक्रार 11 जून रोजी सोलापूर बार असोसिएशनने सोलापूर पोलिस आयुक्तालयात दिली होती. पोलिसांच्या तपासात सोलापूरमधील पांडुरंग वस्तीतील बंद घरातून दुर्गंधी येत असल्याने अधिक चौकशीत अ‍ॅड.कांबळे यांच्या शरीराचे तुकडे करून ते बंद पोत्यात आढळल्याने ही अपहरण करून हत्या झाल्याची बाब उघड झाली तर उत्तरप्रदेशातील आग्रामधील दरवेश यादव या महिलेचीदेखील हत्या झाल्याने दोन्हीही घटनांचा भुसावळ तालुका वकील संघाने तीव्र शब्दात निषेध केला. या गुन्ह्यांमधील आरोपींवर कठोर कारवाई करावी तसेच अ‍ॅडव्होकेट प्रोटेक्शन अ‍ॅक्ट लागू करावा, अशी मागणी प्रांताधिकारी प्रशासनाकडे शुक्रवारी अध्यक्ष अ‍ॅड.तुषार एस.पाटील यांच्या नेतृत्वात करण्यात आली. निवेदन देताना वकील संघाचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.