सोलापूरात दापोडीतील दाम्पत्य ठार

0

पिंपरी : सोलापूरवरुन पुण्याकडे येत असताना गुरुवारी (दि.23) फॉर्च्यूनरगाडी समोरच्या कंटेनरला धडकल्याने या अपघातात दापोडी येथील दाम्पत्य जागीच ठार झाले आहे. संजय विश्‍वंभर गायकवाड (वय 45) व पत्नी वैरुनिका गायकवाड (वय 43) अशी त्यांची नावे आहेत. फॉर्च्युनर मोटारीतून (क्र. एमएच 14 इआर 0928) मधून तुळजापूर तालुक्यातील हंगरगा या गावी दोन दिवसांपूर्वीच आले होते.

गुरुवारी सकाळी ते पुण्याकडे निघाले असता मोडनिंबजवळील गायकवाड वस्तीनजीक त्यांच्या कारने कटेंनरला पाठीमागून जोराची धडक दिली. या अपघातात गाडीचे पूर्ण नुकसान झाले आहे. अपघातानंतर महामार्ग पोलिस पथकाने अपघातग्रस्त वाहने रस्त्याच्या बाजूला काढून दोन्ही मृतदेह मोडनिंबच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले . गायकवाड हे ठेकेदारी आणि प्लॉट खरेदी-विक्रीचा व्यवसाय करीत होते. त्यांच्या पश्‍चात दोन मुले, तीन मुली असा परिवार आहे.