सोलापूर-बार्शी रोडवर अपघात; ५ जण ठार !

0

सोलापूर : सोलापूर-बार्शी रोडवरील शेळगांव-राळेरास दरम्यान एसटी बस व क्रुझर जीपची समारोसमोर धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात पाच जण ठार झाले आहे. अपघात इतका भीषण होता की क्रुझरमधील ४ जण जागीच ठार झाले. एसटी बस क्रमांक एमएच १४ बीटी ३७७५ ही सोलापूरहुन बार्शीकडे जात असता बार्शीहुन सोलापूरकडे येत असलेली क्रुझर जीप (एमएच १३ सीएस ६२३१) या भरधाव वेगात निघालेल्या जीपने एसटीला जोराची धडक दिली. या अपघातात बार्शी पंचायत समिती कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या यात समावेश आहे. अपघातातील जखमींना पुढील उपचारासाठी सोलापूरच्या शासकीय रूग्णालयात दाखल करण्यात आल्याचे पोलीसांनी सांगितले.