सोलापूर : सोलापूर विद्यापीठाला अहिल्याबाई होळकरांचे नाव देण्याच्या निर्णयाला कॅबिनेटमध्ये मंजुरी देण्यात आल्याची माहिती आदिवासी विकासमंत्री विष्णू सावरा यांनी विधानपरिषदेत दिली.
सोलापूर विद्यापीठाला अहिल्याबाई होळकर यांचे नाव द्यावे, अशी मागणी धनगर समाजाकाडून सातत्याने होत आहे. तर शिवयोगी सिद्धरामेश्वर हे सोलापूरचे ग्रामदैवत आहे, त्यामुळे सोलापूर विद्यापीठाला सिद्धेश्वरांचे नाव देण्याची मागणी लिंगायत समाजाने केली होती. मात्र गेल्या महिन्यात नागपूर येथील धनगर समाजाच्या मेळाव्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोलापूर विद्यापीठाला पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचे नाव देण्याची घोषणा केली होती.