सोळसकर यांना उत्कृष्ट समाजसेवक पुरस्कार

0

यवत । पोलिस फ्रेन्डस वेलफेअर असोसिएशन महाराष्ट्र राज्य यांच्याकडून देण्यात येणारा उत्कृष्ट समाजसेवक पुरस्कार दौंड तालुक्यातील कासुर्डी येथील मयुर दत्तात्रय सोळसकर यांना गुरुवारी (दि.9) पिंपरी-चिंचवड येथील कार्यक्रमात प्रदान करण्यात आला.

पिंपरी-चिंचवडचे महापौर नितीन काळजे, सहाय्यक पोलिस आयुक्त राम मांडुरके माजी आमदार दिंगबर भेगडे व असोसिएशनचे अध्यक्ष गजानन चिंचवडे यांच्या हस्ते सोळसकर यांना सन्मापत्रक देऊन गौरविण्यात आले. सोळसकर हे सामाजिक कार्यकर्ते असून अखिल भारतीय युवक मराठा महासंघाचे पुणे जिल्ह्याचे सचिव म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या समाजकार्याची दखल घेऊन त्यांना पोलिस फ्रेन्डस वेलफेअर असोसिऐशनकडून सन्मानित करण्यात आले. अखिल भारतीय मराठा महासंघातर्फे सोळसकर हे त्यांच्या सहकार्‍यांच्या मदतीने सध्या तालुक्यात विविध उपक्रम राबवित आहेत. दरवर्षी श्रावण महिन्यात भुलेश्‍वर येथे यात्रा काळात फराळ वाटप, अनाथ आश्रमात फराळ वाटप, साफसफाई अभियान, वृक्षारोपण तसेच तालुक्यात युवकांचे संघटन, गोरगरीबांना शासकीय योजनांचा लाभ मिळवून देणे, शासकीय योजना समजावून सांगणे हे कार्य सध्या सोळसकर यांच्या वतीने चालू आहे. हे कार्य असेच पुढे चालू ठेवणार असल्याचे सोळसकर यांनी यावेळी सांगितले.