आळंदी : येथील सोळू (ता .खेड) येथून एक युवक व एक युवती असे दोन जण घरात कोणाला काहीही न सांगता रहात्या घरातून बेपत्ता झाल्याची माहिती आळंदी पोलिसांनी दिली.
यामध्ये सुनीता भास्कर पाटोळे (वय 18, रा. सोळू) असे बेपत्ता झालेल्या युवतीचे नाव आहे. तिचे वर्णनात उंची पाच फूट, अंगाने मध्यम, रंग गोरा, चेहरा गोल, कपाळावर जुन्या जखमेचा व्रण, अंगावर पांढर्या रंगाचा कुर्ता व सलवार त्यावर निळ्या रंगाची ओढणी परिधान केलेली आहे. याबाबतची फिर्याद भास्कर तुकाराम पाटोळे यांनी आळंदी ठाण्यात दिली.
दुसर्या बेपत्ता घटनेत नीलेश जनार्धन शिंदे (वय 26, रा. सोळू) असे बेपत्ता युवकाचे नाव आहे. यामध्ये वर्णनात रंग गोरा, उंची पाच फूट पाच इंच, अंगाने सडपातळ, चेहरा उभट, अंगावर हिरव्या रंगाचा शर्ट व निळ्या रंगाची जीन्स पॅन्ट परिधान केलेली आहे. याबाबत आळंदी पोलिस ठाण्यात जनार्धन भानुदास शिंदे यांनी फिर्याद दिली असल्याचे आळंदी पोलिसांनी सांगितले.
वरील दोन्ही वर्णनाचे युवती व युवक कोणाला आढळून आल्यास आळंदी पोलिस ठाण्याशी संपर्क साधण्याचे आवाहन सहाय्यक पोलिस निरीक्षक नंदकुमार गायकवाड यांनी केले आहे. पुढील तपास हवालदार विजय चासकर करीत आहेत.