सोळूत कारचालकास मारहाण

0

आळंदी: सोळू ( ता.खेड) हद्दीत आळंदी मरकळ रस्त्यावर चार अनोळखी इसमांनी सोमवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास एका इसमास गाडीस कट का मारला या कारणा वरून अडवून मारहाण केली.या घटनेत 45 हजार रुपयांची दीड तोळे सोन्याची चैन जबरीने ओढून नेल्या प्रकरणी आळंदी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दिलीप पंजाबराव दोंदल( वय 47 वर्षे,रा.धानोरी,ता.हवेली) यांनी आळंदी पोलीस स्टेशन मध्ये फिर्याद दिली . पोलिस सूत्रांनी माहिती दिल्या वरून येथील सोळू गावाचे हद्दीत असलेल्या दर्ग्याजवळील पुला जवळ रात्री आठ वाजण्याच्या सुमारास दिलीप दोंदल आपल्या एम.एच.14 डी.टी.9086 या कार मधून रस्त्याने चालले असताना दोन स्कुटी वरून आलेल्या चार अनोळखी इसमांनी गाडीस कट का मारला असे म्हणून मारहाण केली व 45 हजार रुपये किंमतीची सोन्याची चैन ओढून नेल्याचे सांगितले. पोलीस उपनिरीक्षक डी.एल.शिंदे तपास करीत आहे.