आळंदी : सोळू (ता. खेड) येथे मोकळ्या जागेत पार्किंग केलेल्या ट्रकमधून 350 किलो वजनाचे 40 नग शिसे अंदाजे 80 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरट्यांनी चोरून नेला. या घटनेची फिर्याद दीपक प्रल्हाद कुंजीर( रा, कासारवाडी, पुणे ) यांनी आळंदी पोलिसांत दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सुनील बळवंत ठाकूर यांच्या घरासमोरील मोकळ्या जागेत फिर्यादीने ट्रक (क्रमांक एम. एच. 14 / सी. पी.08) हा पार्किंग केला होता. चोरट्यांनी या ट्रकमधील 350 किलो वजनाचे 40 नग शिसे रात्रीच्या वेळी चोरट्यांनी चोरून नेले. पुढील तपास पोलीस हवालदार विजय चासकर करीत आहेत.