‘सोवळे’ प्रकरणाचा सर्वपक्षीय निषेध; सभा तहकूब

0

पुणे । डॉ. मेधा खोले यांच्या ‘सोवळे’ प्रकरणाचे पडसाद सोमवारी झालेल्या मुख्य सभेत उमटले. या प्रकरणामुळे सांस्कृतिक पुण्याची उंची कमी झाल्याची भावना सभागृहातर्फे व्यक्त करत या निषेधार्थ एकमताने मुख्यसभा तहकूब करण्यात आली. ‘सोवळं मोडलं’ म्हणून डॉ. खोले यांनी त्यांच्या घरी स्वयंपाक करणार्‍या निर्मला यादव (वय 50) यांच्या विरोधात सिंहगड पोलिस स्टेशनमध्ये फिर्याद दिली होती. या प्रकरणाचे राज्यभरात पडसाद उमटले.