पिंपरी-चिंचवड : स्पोर्ट रिपब्लिक निगडी, पिंपरी-चिंचवड महानगर चेस असोसिएशन आणि पुणे जिल्हा बुद्धिबळ संघटना यांच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या ’सोशल चेस लीग’ स्पर्धा उत्साहात झाल्या. यामधील 17, 13, 11, 9 व 7 वर्षाखालील वयोगटात अनुक्रमे वेद मोने, सोहम भोईर, प्रणव बोगावत, श्रावण उंडाळे व कुशाग्र जैन यांनी विजय मिळवला. स्पर्धेत पुणे, औरंगाबाद, अलिबाग आदी ठिकाणांहून 156 स्पर्धक सहभागी झाले.
वेद मोन याने जिंकल्या पाचही फेर्या
17 वर्षाखालील वयोगटात वेद मोने या स्पर्धकाने पाचही फेर्या जिंकत निर्विवाद वर्चस्व राखले. क्षितिज कर्ण चार गुणांसह उपविजेता ठरला. ओम लामकाने, प्रतीक मेहता, वैभव कदम, सुदर्शन अय्यर, मानसी ठाणेकर, श्रयांश शिंगवी, संस्कृती पाटील व प्रज्ञेश इंगोले यांनी अनुक्रमे तीन ते दहा अशी बक्षिसे मिळवली. तेरा वर्षाखालील वयोगटात सात फेर्यांपैकी 6.5 गुण मिळवत अव्वल ठरला. प्रतीक बिक्कड, स्वराज देव, सर्वेश सावंत, श्रीनिवास कुलकर्णी, रितेश शेलार, आयुष मारभल, कुंज बन्सल, अमोघ कुलकर्णी व श्री पाटील यांनी गुण व टायब्रेक गुणांसह दोन ते दहा क्रमांक मिळवले.
प्रणवला मिळाले 6.5 गुण
अकरा वर्षाखालील वयोगटात सात फेर्यांपैकी 6.5 गुण प्राप्त करीत प्रणव बोगावत विजेता तर रिषभ जठार सहा गुणांसह दुसर्या स्थानावर राहिला. तर तीन ते दहा क्रमांकावर अनुक्रमे शौर्य हेर्लेकर, ज्योतिरादित्य देशपांडे, संजय नाईक, ऐश्वर्या अभ्यंकर, ओम शिंदे, पालाश रायतूरकर, असीम गोडबोले व लाव्या मेनन यांनी स्थान मिळवले. नऊ वर्षाखालील गटात श्रावणी उंडाळे, अंशुल बसवंती, आर्य पाटील व मानस तावरी यांचे सहा फे-यांनंतर समान गुण झाले. त्यामुळे टायब्रेक गुणांनुसार श्रावणी उंडाळेला विजेती तर अंशुलला उपविजेता म्हणून घोषित करण्यात आले. आर्य व मानस यांना मात्र अनुक्रमे तिसर्या व चौथ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले. ललितादित्य नदार, आर्यन गांधी, शंतनू गायकवाड, जयम मारभल व दीपांशू लोखंडे यांनी अनुक्रमे पाच ते दहा क्रमांक पटकावले. सात वर्षाखालील वयोगटात कुशाग्र जैन याने सहा फेर्यांमध्ये 5.5 गुण मिळवत पहिला तर हितांश जैन, अर्जुन राजे, अपेक्षा मारभल, युवराज पाटील, रोहित लागू, आर्यन राव, नोअमान पाचवडकर, सोहम जठार व अनिश रावते यांनी दोन ते दहा क्रमांकावर आले.
विजेत्यांना पारितोषिक प्रदान
ज्ञानप्रबोधिनी विद्यालय निगडीचे उपकेंद्रप्रमुख मनोज देवळेकर, पिंपरी-चिंचवड महानगर चेस असोसिएशनचे अध्यक्ष विवेक भागवत व ज्येष्ठ क्रीडा संघटक सदाशिव गोडसे यांच्या हस्ते स्पर्धेतील विजेत्यांना पारितोषिक देण्यात आले. प्रास्ताविक स्पोर्ट रिपब्लिकचे संचालक श्रीराम कुंटे यांनी केले. ओमप्रकाश तिवारी यांनी आभार व्यक्त केले. इंटरनॅशनल ऑर्बिटर नितीन शेणवी यांनी मुख्य पंच म्हणून तर विकास देशपांडे, सदाशिव गोडसे, गुरुनाथ कुलकर्णी, मानसी देशपांडे व शुभम चतुर्वेदी यांनी सहाय्यक पंच म्हणून काम पहिले.