जामनेर: कोरोना विषाणू प्रादुर्भाव रोखण्यासाठी करण्यात आलेल्या लॉक डाउनमुळे हातावर पोट भरणारे गरीब मजूर व कष्टकरी लोकांना आपल्या पोटापाण्याची चिंता सतावत होती. त्यासाठी रेशनिंग धान्याचे लाभार्थ्यांना राज्य सरकारने एप्रिलमध्ये धान्य वाटप करायचे नियमित धान्य १ तारखेपासून उपलब्ध करून दिले आहे. केंद्र सरकारकडून लाभार्थ्यांना प्रतिव्यक्ती ५ किलो तांदुळाचे वाटप रेशनिंग दुकानातून १० एप्रिलनंतर चालू करण्यात येणार आहे. याबाबत सूचना जामनेर तहसीलमधील पुरवठा विभागाकडून देण्यात आल्या आहेत. मात्र धान्य घेतांना सोशल डिस्टन्स ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
विनाकारण रेशन दुकाना समोर गर्दी करू नये असे आवाहन करण्यात आले आहे.