सोशल मिडिया सेल शहराध्यक्षपदी योगेश थोरात यांची नियुक्ती

0

धुळे । जिल्हा (शहर) राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सोशल मिडिया शहर अध्यक्षपदी व माहिती तंत्रज्ञान सेलच्या (प्रभारी)शहर अध्यक्षपदी योगेश भिकचंद थोरात यांची निवड करण्यात आली. मुंबई येथे प्रदेश कार्यालयात सुनील तटकरे व मा.आमदार बाबासाहेब राजवर्धनजी कदमबांडे यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले. यावेळी महिला प्रदेशअध्यक्षा चित्रा वाघ, प्रदेशप्रवक्ता नवाब मलिक, जिल्हाध्यक्ष मनोज मोरे,मा.नगरसेवक राजूआण्णा बोरसे,मा. नगरसेवक संजय वाल्हे, मा. नगरसेवक बाळूभाऊ आगलावे,प्रभाकर पाटील,सत्यजित सिसोदे उपस्थित होते.

विधायक वापर

पक्षाचे ध्येयधोरणे तसेच सरकारने घेतलेले चुकीचे निर्णय,पक्षावर व पक्षाच्या नेत्यांवर टीका टिपणी करणार्‍यांना त्यांच्याच भाषेत उत्तर देण्यासाठी,पक्षाने केलेली विकासाची व विधायक कामे, देशातील तसेच राज्यातील घडामोडी सोशल मिडीयाच्या माध्यमातून जनतेपर्यंत पोचवण्याची जबाबदारी पक्षाने सोपवली. या नियुक्तीबद्दल त्यांचे सर्व स्तरावरून अभिनंदन करण्यात येत आहे.