शेखर पाटील ; रावेर येथे पत्रकार दिनानिमित्त कार्यक्रम
रावेर : सोशल मीडियाच्या युगातही पत्रकारांनी आपले अस्तित्व टिकवून ठेवले ही बाब कौतुकास्पद आहे व ज्या पध्दतीने सैनिक बॉर्डरवर राहून आपल्या जीवाची पर्वा न कारता लढतात त्याच पध्दतीने पत्रकारसुध्दा सैनिका प्रमाणे समाज्यात लढत असतात त्यामुळे त्यांना नेहमी समाजाने सहकार्य करण्याची गरज आहे, असे स्पष्ट मत ‘दैनिक जनशक्ती’चे संपादक शेखर पाटील यांनी येथे व्यक्त केले. निळे निशान सामाजिक संघटनेतर्फे येथील कमलाबाई मुलींच्या हायस्कूलमध्ये पत्रकार दिनानिमित्त कार्यक्रम झाला. याप्रसंगी पाटील बोलत होते. व्यासपीठावर माजी आमदार अरुण पाटील, माजी नगराध्यक्ष शीतल पाटील, राष्ट्रवादी किसान सेल जिल्हाध्यक्ष सोपान पाटील, पत्रकार दीपक नगरे, अॅड योगेश गजरे, एम.ए.खान, एल.डी.निकम, भाजपा सरचिटणीस वासु नरवाडे, रिपाइं जिल्हाध्यक्ष आनंद बाविस्कर, विलास ताठे, आदी उपस्थित होते.
यांचा झाला सत्कार
प्रसंगी पत्रकार देवलाल पाटील, कृष्णा पाटील, दिलीप वैद्य, कुमार नरवाडे, शकील शेख, सतीष नाईक, सुनील चौधरी, शालिक महाजन, शमशेर खान, गणेश शिंपी, शरीफ शेख, रवींद्र महाजन, राहुल गडे, जयंत महाराज, मोरेश्वर सुरवाडे, सरदार पिंजारी, विजय पाटील, जगनाथ लुल्हेख नगीनदास इंगळे आदी पत्रकारांचा सत्कार यावेळी करण्यात आला.