सोशल मिडीयावर आक्षेपार्ह चित्रफीत : वाघोद्याच्या बीएलओला नोटीस

0

रावेर- व्हाटस्अपवरून आक्षेपार्ह चित्रफित प्रसारीत केल्या बद्दल वाघोदा बुद्रुक (ता. रावेर) येथील एका बीएलओ यांस प्रांताधिकारी यांनी नोटीस बजावली आहे. वाघोदा बुद्रुक येथील मतदान केंद्रस्तरीय अधिकारी शेख नूर मोहम्मद शेख अब्दुल (यादी भाग क्रमांक सहा) यांनी व्हाट्सअप ग्रुपवरून शनिवारी सकाळी धार्मिक तेढ निर्माण होईल, असे चिथावणी खोर संदेश (चित्रफित) टाकली. रावेर शहर हे जातीय दृष्ट्या अतिसंवेदनशील असून किरकोळ कारणावरून अप्रिय घटना घडल्या आहेत. शासकीय सेवेत काम करत असताना असे वर्तन होणे अत्यंत अशोभनीय आहे. कार्यालयातर्फे व्हाट्सअप ग्रुपवरून वारंवार सूचना देण्यात येऊनही शेख यांनी ग्रुपवर अनावश्यक व कार्यालयीन कामकाज व्यतिरिक्त संदेश टाकलयाने त्यांच्याविरुद्ध कारवाई का करण्यात येऊ नये, अशी नोटीस शेख यांना पाठविण्यात आली आहे. नोटीस मिळाल्यानंतर सात दिवसात समक्ष सादर करावा व खुलासा प्राप्त न झाल्यास अथवा समाधानकारक नसल्यास आपल्या विरूध्द कारवाई करण्यात येईल, अशी तंबी नोटीसीद्वारे प्रांताधिकारी अजितकुमार थोरबोले यांनी दिली आहे.