निंभोरा /खिर्डी : सोशल मिडीयावर दोन समाजात तेढ निर्माण करणारी पोस्ट टाकल्याप्रकरणी संदीप अशोक खाचणे (39, खाचणे वाडा) याच्याविरुद्धव् गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपीने यंग जनरेशन निंभोरा ग्रुपवर दोन समाजात शत्रुत्व व द्वेषभावना निर्माण होईल अश्या आशयाचे मेसेज व फोटो प्रसारीत केल्याने त्याच्याविरुद्ध निंभोरा पोलिस पोलिसात हवालदार राकेश वराडे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला. तपास उप विभागीय पोलीस अधिकारी फैजपूर नरेंद्र पिंगळे व सहाय्यक निरीक्षक महेश जानकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हेड कॉन्स्टेबल विकास कोल्हे ,बाळू पाटील, राकेश वराडे, स्वप्नील पाटील, सुनील वंजारी, संदीप पाटील करीत आहेत. आरोपीला अटक करण्यात आली आहे. दरम्यान, नागरीकांनी मोबाईल फोन वरून कोरोना या साथीच्या रोगाच्या अनुषंगाने कोणीही आक्षेपार्ह मेसेज, फोटो तसेच कुठलीही जाती धर्मामध्ये द्वेषभावना निर्माण होईल अशा आशयाचे मेसेज व फोटो प्रसारीरत करू नय व तसे केल्यास कायद्यानुसार कडक कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे.