सोशल मिडीयावर गटारीची समस्या व्हायरल

0

नवापूर । प्रभाग क्रमांक 7 मध्ये भर रस्त्यांवर मागच्या 15 वर्षांपासून उघडी असलेली गटार अनेकांचा अपघाताचे कारण बनली होती. यासंदर्भांत अनेक वेळा तक्रारी करुन देखील ती बंद होईना. अनेक वाहन पडून अनेक जण जखमी झाले. लहान मुले त्यात पडली. वयोवृध्द त्या गटारीत पडल्याने जखमी झाले आहेत. ती उघडी गटार या परिसरातील आरोग्य बिघडवीत होती. त्या गटारीतुन दुर्गधी येऊन मच्छरांचे प्रमाण वाढले होते. या भागातील नगरसेवकाला पाच वर्षात एक उघडी गटार रहिवांशाचा अनेक तक्रारी असुन ती बंद करता आली नाही हे या प्रभागाचे दुर्दव असल्याचे नागरिकांनी सांगितले.

पंधरा वर्षानंतर बंदीस्त झाली गटार
या भागात अनेक खड्डे आहेत ते बुजण्यात आलेले नाहीत. याबाबत या भागातील एक तरुण शिवशाहीर कवी सुनील पवार यांनी प्रभाग क्रमांक 7 मध्ये रस्त्यातली मागच्या 15 वर्षांपासून उघडी असलेली गटार शोधून बंद करा…मत मागायला येताना पाय अडकून पडाल उगीचच…अशी पोष्ट सोशल मिडीया वर टाकताच ती चर्चचा विषय ठरला. अखेर नगरपालिका मुख्याधिकारी राजेंद्र शिंदे यांनी नगर पालिका अधिकार्‍यांना काम करण्याचा आदेश दिला. आज आरोग्य विभागाच्या कर्मचार्‍यांनी उघडी गटार 15 वर्षांनंतर बंद केली. या कामाला धनंजय शिंदे,अजय तांबोळी,विजय पाटील,शैलेश वसावे व यांच्या सहकार्‍यांनी केले. सुनील पवार यांनी दिलेले लक्ष व पाठपुरावा व मुख्याधिकारी राजेंद्र शिंदे यांनी त्वरीत दखल घेऊन काम केल्याने या परिसरालील नागरीकांनी आभार मानुन समाधान व्यक्त केले.