जळगाव । विविध सामाजिक समस्या व अडचणी मांडण्यासाठी सर्वात प्रभावी माध्यम म्हणून सध्याच्या काळात सोशल मिडियासारखे दुसरे उत्तम व्यासपीठ नाही, मात्र सोशल मिडीया वापरताना सत्यता पडताळणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन दैनिक जनशक्तिचे निलेश झालटे यांनी केले. जनसंवाद आणि पत्रकारिता विभाग, उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव येथे आयोजित सोशल मीडियाचा वापर आणि ब्लॉग लेखन या एक दिवसीय कार्यशाळेत केले. यावेळी व्यासपीठावर निलेश झालटे, तुषार भांबरे, विभागप्रमुख डॉ.तुकाराम दौड, डॉ. सुधीर भटकर, प्रा.संदीप केदार हे उपस्थित होते. दोन सत्रात या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.
माध्यमे हाताळतांना सतर्क रहा ः निलेश झालटे पुढे म्हणाले की, विविध सामाजिक विषयांवर सोशल माध्यमांवर माहितीचे देवाणघेवाण करतांना सत्यता पडताळून पाहणे गरजेचे आहे. संदेशवहनाचे जलद माध्यम म्हणून सोशल मिडियाची ओळख आज निर्माण झाली आहे. ही माध्यमे जगाला तुमची दखल घ्यायला भाग पाडतात. माहितीचा होणारा मारा हा सकारात्मक किंवा नकारात्मक आहे हे ओळखता आले की त्यांचा उपयोग प्रभावी ठरतो. स्वत:च्या भाषेत व्यक्त होण्यासाठी या माध्यमांची लोकप्रियता अलिकडे वाढते आहे मात्र ही माध्यमे हाताळतांना अत्यंत सतर्क राहून गेटकिपर सिध्दांत समजवून घेऊन जबाबदार नागरीक म्हणून माहितीची देवाण-घेवाण करतांना सतर्क राहणे काळाची गरज आहे.
ब्लॉगनिर्मिती अत्यंत सोपी प्रक्रिया
सोशल माध्यमांच्या तांत्रिक बाबींची हाताळणी व वापर तसेच ब्लॉग खाते उघडणे याविषयी भामरे यांनी सोप्या भाषेत ब्लॉग निर्मिती तसेच ऑनलाईन माध्यमातून रोजगार निर्मिती कशा पध्दतीने करता येवू शकते. याविषयी सोप्या भाषेत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी प्रात्यक्षिकाद्वारे विद्यार्थ्यांना सहज सोप्या भाषेत ब्लॉगर तसेच वर्डप्रेस यावर ब्लॉगची निर्मिती करून ती कशाप्रकारे हाताळावे याविषयी समजावून सांगितले.
विविध शंकांचे निरसन
प्रश्नोत्तरांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या विविध शंकांचे निरसन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक वसंत कुलकर्णी यांनी तर सुत्रसंचालन व पाहुण्यांचा परिचय प्रियंका ठाकूर यांनी केला. सपना पवार यांनी आभार मानले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रियंका ठाकूर, सपना पवार, रंजना चौधरी, गणेश महालपुरे, ज्ञानेश्वर थोरात, वसंत कुलकर्णी, जयपाल गिरासे, रमेश कारंडे, शरद चव्हाण, योगेश जाधव, प्रदिप चव्हाण, अतुल कोठावदे, अभिलाष पारधे, प्रकाश झोपे, सुनील रडे, विष्णु कोळी आदींनी
परिश्रम घेतले.