नवी दिल्ली । सोशल मीडियाचा प्रभाव गेल्या काही वर्षांत कमालीचा वाढलाय, असे मत व्यक्त केले आहे ते आपले राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी. ते म्हणाले की, तंत्रज्ञानाचा वापर वाढल्याने माध्यमांचा मोठ्या प्रमाणावर विस्तार झाला आहे. त्यामुळे तंत्रज्ञानासोबत माध्यमेही जास्त प्रभावी ठरत आहेत. एका कार्यक्रमात बोलताना ते म्हणाले, ‘प्रिंट पत्रकारिता मात्र आपली वेगळी जागा राखून आहे. कारण त्यात वर्षानुवर्षे लिहून येणारे कॉलम्स वाचकांमध्ये आपली आवड कायम ठेवून आहेत.’