सोशल मीडियाचे स्टार

0

सुहानाला लहानपणापासून सिंगर बनायचे होते. घरच्यांना मात्र तिचे स्वप्न अमान्य होते. त्यांनी तिला खूप विरोध केला. मात्र, तिने सिंगर बनण्याचे जणू ठाणलेच होते. घरच्यांनी केलेल्या विरोधाला जुगारुन तिने गरुड झेप घेण्याचे ठरविले. अन् सर्वाधिक प्रभावशाली माध्यमांपैकी एक असलेल्या सोशलमिडीयाचा तिने आधार घेतला. स्वतःच्या आवाजातील एक व्हिडीओ तिने युट्यूबवर शेअर केला. अन् झाली ना राव ती फेमस…सुहानासारखे अनेक सिक्रेट स्टार आहेत. सर्व विरोध जुगारुन युट्युबच्या माध्यमातून स्वतःच्या कलागुणांना त्यांनी व्यासपीठ मिळून दिले आहे. अन् टायलंटच्या जोरावर लुकलुकत्या तारांना रातोरात प्रसिद्धीदेखिल मिळाली आहे. तुमच्यात सुप्त गुण असतील तर तुम्ही देखिल अशा प्रभावी माध्यमांचा वापर करा आणि सुहानासारखे स्वत:चे स्वप्न पूर्ण करा.