सोशल मीडियामध्ये वेळ वाया न घालता परिश्रम घ्या – आमोद भाटे

0
सीए विद्यार्थी परिषदेला उत्स्फूर्त प्रतिसाद 
पिंपरी चिंचवड : विद्यार्थ्यांनी आयुष्यात सकारात्मक दृष्टीकोण ठेवावा, ध्येय गाठताना लक्षकेंद्रित करून कठोर परिश्रम घ्या. सोशल मीडियामध्ये वेळ वाया घालू नका, असा सल्ला सीए पिंपरी चिंचवड शाखेचे अध्यक्ष आमोद भाटे यांनी विद्यार्थ्यांना दिला. निगडी येथील दि इंस्टिट्यूट ऑफ़ चार्टर्ड अकाउंट ऑफ इंडिया (आयसीएआय) पिंपरी-चिंचवड शाखेच्या वतीने आयोजित सीए विद्यार्थी परिषदेस उत्स्फूर्तपणे प्रतिसाद मिळाला. यावेळी आयसीएआयच्या पश्‍चिम विभागाचे माजी अध्यक्ष डॉ. अशोककुमार पगारीया, पिंपरी चिंचवड शाखेचे अध्यक्ष सीए आमोद भाटे, सीए विद्यार्थी संघटना अध्यक्ष सीए युवराज तावरे, खजिनदार प्राजक्ता चिंचोळकर, रवींद्र नेरलीकर, माजी अध्यक्ष सुहास गार्डी, सुनील कारभारी, कार्यकारी सदस्य संतोष संचेती, अनिल अग्रवाल, सचिन बन्सल, विद्यार्थी प्रतिनिधी ओमकार धामणे, ओमकार डांगले, रिद्धी पांडे,ऋचा कुलकर्णी आदी उपस्थित होते.
सीएला अपडेट राहण्याची गरज…
दोन दिवशीय परिषदेत सीए पराग राठी, सीए  वर्धमान जैन, वैभव सांकला, भूषण तोष्णीवाल, अनूप पेंडसे, शेखर साने, रवी सोमाणी, कुसाइ गाववाला यांनी मार्गदर्शन केले. आयसीएआयच्या हिशोब प्रणाली समितीचे अध्यक्ष शिवाजी झावरे यांच्या उपस्थितीत या परिषदेची सांगता झाली. झावरे म्हणाले की, सीए हा व्यवसाय अर्थकारणाशी संबंधीत आहे. केंद्र सरकारच्या बदलत्या ध्येय धोरणांवर आपल्याला अपडेट रहावे लागते. बदलत्या काळानुसार सीए ने बदलले पाहिजेत. सीए हा फायनान्शियल डॉक्टर असतो. समाजात आर्थिक परिवर्तन घडविण्याची जबाबदारी सीए वर आहे. या परिषदेत 150 सीए विद्यार्थी सहभागी झाले होते.