मुंबई: काल शुक्रवारी रात्री साताऱ्यात राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी भरपावसात सभा घेतली. धो-धो बरसणाऱ्या पावसात वयोवृद्ध आणि अनेक व्याधी असतानाही शरद पवार पावसात भक्कमपणे उभे राहत भाषण केले. शरद पवारांच्या या कृतीने अनेकांना मोहिनी घातली. त्यामुळेच काल रात्रीपासून सोशल मीडियावरील वातावरण ‘पवारमय’ झाले आहे. पवारांच्या विरोधी असलेले देखील राजकारणापलीकडे जाऊन त्यांच्या या कृत्याचा कौतुक करत आहेत.
या सभेचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताच, फेसबुकवरील प्रत्येक दोन-तीन पोस्टनंतर पवारांविषयीकी पोस्त दिसत आहे. सोशल मीडियावर पवारांचा झंझावात विरोधक कुठही दिसत नसल्याची स्थिती आहे.
काल पावसामुळे नेक दिग्गज नेत्यांच्या सभा रद्द झाल्या. मात्र शरद पवारांनी भर पावसात सभा घेऊन सगळ्यांचे मन जिंकले. राष्ट्रवादीतील अनेक दिग्गज नेते सोडून गेल्यामुळे कमकुवत झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसला शरद पवार यांनी पुन्हा एकदा ट्रॅकवर आणले. एवढच नाही तर राज्यात काढलेल्या दौऱ्यातून अनेकांना आपलस केले. त्यातच ईडीने गुन्हा दाखल केलेल्या गुन्ह्यामुळे पवाराविषयी आणखीच आकर्षण निर्माण झाले. एकंदरीत पवारांचा झंझावात निर्माण झाला होता.