खिर्डी : सोशल मीडियावरील फेसबुकच्या माध्यमातून एका समाजाच्या धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी रवींद्र पंडित महाले (निंभोरा) याच्याविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला. आरोपीने 5 रोजी आपल्या फेसबुक अकाउंटवरून विशिष्ट समाजाच्या भावना दुखतील, अशी पोस्ट शेअर केली हेाती. पोलिसांनी ताबडतोब दखल घेत दोन समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी आरोपीविरुद्ध कारवाई केली. पोलिस कर्मचारी स्वप्नील पाटील यांच्या फिर्यादीनुसार आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपीस अटक करण्यात आल. दरम्यान, धार्मिक भावना दुखावणारी पोस्ट, फोटो किंवा मजकूर सोशल मीडियावर प्रसारीत केल्यास कारवाई करण्यात येईल, असा इशारा निंभोरा पोलिसांनी दिला आहे. तपास उपनिरीक्षक योगेश शिंदे, रा.का.पाटील, विकास कोल्हे, अनिल साळुंखे, सुनील वंजारी करीत आहे.