ऐरोलीतील घटना; एकाचा मृत्यू, तिघे गंभीर
नवी मुंबई । सोसायटीमध्ये झालेल्या वादातून चौघांवर कोयत्याने हल्ला करण्यात आल्याची धक्कादायक घटना बुधवारी सकाळी ऐरोली मध्ये घडली आहे. यात एकाचा मृत्यू झाला असून तिघे जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना तत्काळ रुग्णालयात भरती करण्यात आले असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे. या प्रकरणी रबाले पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करत आहेत. ऐरोली सेक्टर 2 मधील रोझ वुड सोसायटीत भरदिवसा ही घटना घडली.
पोलिसांनी एकाला घेतले ताब्यात
या सोसायटीमध्ये सकाळी मिटिंग झाली. त्या वादातून हा हल्ला झाल्याची शक्यता आहे. संतप्त जमावाने चौधरी मेडिकलमध्ये घुसून हा हल्ला केला. आरोपींपैकी पोलिसांनी एकाला ताब्यात घेतले आहे. आरोपीचे नाव समजू शकलेले नाही. रवी चौधरी असे मृताचे नाव आहे. सोहम, अर्जून, मोहन हे गंभीर जखमी असून, तिघांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हे तिघेही सख्खे भाऊ आहेत. रबाळे पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून, याप्रकरणी तपास सुरूआहे.