मुंबई : वर्सोवा येथील श्रद्धा हौसिंग सोसायटीमध्ये मांजरांनी अक्षशः धुमाकूळ घातला होता, त्यामुळे सोसायटीतील नागरिकांनी अखेर यातून सुटका करवून घेण्यासाठी या माजरींना सफाई कामगारांच्या मदतीने मारहाण करत त्यांना गोणीत कोंबून अज्ञात स्थळी नेऊन सोडले. त्याविरोधात प्राणी मित्र संघटनांनी पोलिसांत तक्रार केली. त्याची दखल घेत पोलिसांनीही गुन्हा दाखल केला.
काय आहे प्रकरण
सोसायटीतील रहिवाशांनी याआधी या प्रकरणी प्राणी संघटना किंवा पालिकेला कळवणे अपेक्षित असतांना रहिवाशांनी परस्पर या मांजरींचा बंदोबस्त करण्याची योजना आखली. त्याप्रमाणे सफाई कामगारांनी त्या मांजरांना अक्षरशः अमानुष मारहाण करत, इमारतींवर आपटत त्यांना गोणीत भरले आणि त्यांना अज्ञात स्थळी सोडले.
घटनेच्या व्हिडिओने गुन्हा दाखल
या घटनेचा व्हिडीओ एका नागरिकाने पॉज संस्थेला पाठवला. त्यानंतर या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सुनिश सुब्रमन्यन कुंजू यांनी प्रिवेशिअल ऑफ कॉरेलातीवे नुसार मांजरींना अशा पद्धतीने पकडणे हा गुन्हा असून ह्या गुन्ह्यानुसार कुंजू यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना पत्र लिहिले होते. त्या पत्रानुसार पोलिसांनी अज्ञात विरोधात गुन्हा दाखल केला आहे. यापुढे पोलीस या सोसायटीत जाऊन रहिवाष्याची चौकशी करून योग्य ती कारवाई करणार आहेत.