सोहराबुद्दीन प्रकरणाची चौकशी करणाऱ्या आयपीएस अधिकाऱ्याचा राजीनामा

0

नवी दिल्ली। सोहराबुद्दीन शेख एनकाउंटर प्रकरणी चौकशी करीत असलेले १९९२ मधील गुजरात कॅडेरचे आयपीएस अधिकारी रजनीश राय याने पदाचा राजीनामा दिला आहे. त्यांनी तसा अर्ज दिला आहे. मात्र त्यांचा अर्ज गृह मंत्रालयाने नामंजूर केला आहे. केंद्राच्या या निर्णयाला आता त्यांनी अहमदाबाद केंद्रीय प्रशासनिक अधिकरणमध्ये आव्हान दिले आहे.

अधिकरणने केंद्राला आणि गुजरात सरकारला १० दिवसाची नोटीस देत खुलासा देण्याचे सांगितले आहे. रजनीश राय आंध्र प्रदेशातील चित्तूर जिल्ह्यात कार्यरत आहे.