जळगाव । येथील जाणीव परिवार व दर्पण पब्लिकेशन आयोजित कालकथित रामदास मेढे सभागृहात बौध्द समाज वधू-वर परिचय मेळाव्यात सुमारे 500 मुला, मुलींनी परिचय दिला. महाराष्ट्र, गुजराथ, मध्य प्रदेश येथून आलेल्या पालकांनी परस्पर परिचय करुन घेत मेळावास्थळी 25 विवाहांची प्राथमिक बोलणी यशस्वी झाली. बालगंधर्व नाट्यगृहात मंचावर प्रमुख अतिथी राष्ट्रपती पोलिस पदक प्राप्त विकास यावलकर, विश्वासराव बिर्हाडे, बी.एफ. भालेराव, विजयकुमार कोसोदे, शुभांगी बिर्हाडे, अश्विनी लोखंडे, श्रीमती इंदुबाई मेढे, शिक्षणाधिकारी रविकिरण बिर्हाडे, यशोदाई तायडे, पराग कोचुरे, उषाबाई वाघ, अशोक बाविस्कर व सुधा तायडे-वाघ यांची उपस्थिती होती. मान्यवरांचा गौरव राष्ट्रपती पोलीसपदक प्राप्त दिनकरराव अडकमोल, जगदिश गाढे, अरुण वाघ, कमला सोनवणे, मंगला पगारे, वर्षा बागुल, प्रदीप सोनवणे, विमलताई अडकमोल व अनिल सर यांनी केले.
अपेक्षांचे ओझे ठेवल्याने लग्नाचे वाढले वय
यावेळी उदघाटक सुरेश उर्फ राजूमामा भोळे यांनी दहा वर्षातील यशस्वी मेळाव्याचे संयोजन करणार्या जाणीव परिवाराचे कौतुक करुन सध्या भेडसावत असणार्या स्त्री भ्रुण हत्त्या तसेच अपेक्षांचे ओझे ठेवल्याने वाढणारे लग्नाचे वय यावर भाष्य करतांना सकारात्मक विचारसरणीचा संदेश दिला. महापौर ललित कोल्हे यांनी आयोजकांचे कौतुक करुन सर्वतोपरी सहकार्याचे आश्वासन दिले. अश्विनी लोखंडे, शुभांगी बिर्हाडे, विकास यावलकर व अॅड. राजेश झाल्टे यांनीही समाजबांधवांशी हितगुज केले. यावेळी अॅड.राजेश झाल्टे यांनी 11 हजार रुपये निधी दिला. तसेच शुभांगी बिर्हाडे यांनी 2100ची देणगी दिली.
यांनी घेतले परिश्रम
प्रास्ताविक संयोजक युवराज वाघ यांनी केले. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते भगवान बुध्द प्रतिमेस पुष्पांजली व भारत रत्न डॉ. आंबेडकर प्रतिमेस माल्यार्पण,बुध्दवंदना होवून वधू-वर सुचीचे प्रकाशन करण्यात आले. यशस्वीतेसाठी आंचल वाघ, बी.एम. इंगळे, चेतन वाघ, महादेव पाटील, महेंद्र सोनवणे, राजेंद्र सपकाळे, श्रीकांत तायडे, सुनिल बिर्हाडे, दिलीप पाटील, विजय म्हस्के, उमेश तायडे, अविनाश पगारे, नितीन मोरे, अजित पिंजारी,प्रमोद पाटील यांनी परिश्रम घेतले.