सौदीत तलाकचे प्रमाण वाढले

0

सौदी अरेबियामध्ये पत्नीला तलाक देण्याची अनेक हास्यास्पद कारणे समोर येत आहेत. तेथे पुरूषांना पत्नीपासून फारकत घेण्यासाठी सोपे मार्ग असल्यामुळे पावलोपावली तलाक दिला जात आहे.

सौदीत एका पुरूषाने बायको पुढे पुढे चालते म्हणून तलाक दिला. त्याच्या मते तिला कित्येकदा सांगितले होते की असं पुढे चालू नको. तरीही तिने ऐकल नाही. मग दिला तलाक. प्रसारमाध्यमांनी त्या व्यक्तीचे नाव समजले नाही असे सांगतिले पण कारण मात्र नक्की तेच आहे. एका महिलेला जेवणात कोणतातरी पदार्थ वाढला नाही म्हणून पतिच्या रागाला सामोरे जावे लागले आणि तलाक मिळाला. एक पत्नी हनीमूनच्या वेळी पैंजण घालायला विसरली आणि वैवाहिक जीवन संपले. पतीराज रागवले आणि तलाक दिला. हुमूद अल शिम्मरी हे सौदीत विवाह लावतात. त्यांच्या मते तलाकचे प्रमाण वाढले आहे. त्याला कारणीभूत तंत्रज्ञान आहे असे काझीसाहेबांचे म्हणणे आहे.