दोंडाईचा । दोंडाईचा वि.प्र.हस्ती पब्लिक स्कूल अॅन्ड ज्यु.कॉलेज या शाळेचे हस्ती सांस्कृतिक कला व क्रीडा मंडळ गेल्या 8 वर्षापासून गणेशोत्सव साजरा करीत आहे. यावर्षी मंडळाने आगळा-वेगळा, स्काऊट रुपातील पर्यावरण पूरक बाप्पांच्या मुर्तीची स्थापना केली होती. पर्यावरण पूरक गणेशोत्सव साजरा करण्याचा यावर्षी चौथा वर्ष होता. सातव्या दिवशी शहरात विद्यार्थ्यांनी ढोल-ताशाच्या पथकासह मिरवणूक काढून बाप्पाला निरोप दिला. यात 3 री ते 12 वी पर्यतच्या विद्यार्थी तसेच शिक्षकांचा समावेश होता. स्काऊट रुपातील गणेश मुर्ती तारेची जाळी व गोणपाट यांच्या सहाय्याने बनविण्यात आले होते. तारेच्या जाळीचे झाडांचे पिंजरे बनविण्यासाठी आणि गोणपाटांचा वापर झाडांच्या रोपांना सावलीसाठी करण्यात येणार आहे.