जळगाव । नवीन बसस्थानकाच्या आऊटगेटवर स्कुटी बसखाली चिरडल्या गेल्याने तरूणाने वयोवृध्द बसचालकाला मारहाण केल्याची घटना दुपारी 1.30 वाजेच्या सुमारास घडली. दरम्यान, संघटना व युनियन कर्मचारी जमल्यानंतर त्या दुचाकीस्वारालाही चांगलाच चोप दिल्यानंतर वाद जिल्हा पेठ पोलिस ठाण्यात पोहाचला. परंतू पोलिसांच्या दोघांची समजूत घातल्यानंतर वादावर पडदा पडाला. त्यामुळे याप्रकरणी पोलिस ठाण्यात कोणतीही नोंद नाही.
वाद पोहाचला जिल्हा पेठ पोलिस ठाण्यात
दुपारी 1.30 वाजेच्या सुमारास गोपाळ आत्माराम सपकाळे हे वयोवृध्द एसटी बसचालक नवीन बस्थानकातून बस घेवून आऊट गेटमधून जात असतांना भावेश पुंडलिक चौधरी (रा. अयोध्यानगर) हा स्कुटी (क्रं.एमएच.19.एए.3390) ने विरूध्द दिशेने आऊटगेटमधून नवीन बसस्थानकात प्रवेश करत होता. त्यादरम्यान, एसटी बस स्कुटीला धडकून स्कुटी बसच्या खाली चिरडली गेली आणि त्यात स्कुटीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. संतप्त झालेल्या स्कुटी चालकाने चक्क रागाच्या भरात बसच्या स्टेअरींगवर चढून बसचालक गोपाळ सपकाळे यांना मारहाण केली. यावेळी घटनेस्थळी मोठ्या प्रमाणात बघ्यांची गर्दी जमली. चालकाला मारहाण होत असल्याची माहिती एसटी महामंडळ युनियन व संघटनांच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांना माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी घाटत स्कुटीचालक भावेश याला चांगलाच चोप दिला. यानंतर वाद जिल्हा पेठ पोलिस ठाण्यात पोहोचल्यानंतर पोलिसांनी दोघांची समजूत घातली. दोघांमध्ये समझोता झाल्यानंतर वादावर पडदा पडला. त्यामुळे या घटनेप्रकरणी जिल्हा पोलिस ठाण्यात कोणतीही नोंद नाही.