स्केटींग स्पर्धेत पोलिस स्केटींग क्लबचे यश

0

जळगाव। नाशिक येथे हॉटव्हील्स क्लब व खासदार हेमंत गोडसे सामाजिक प्रतिष्ठानतर्फे पहिल्या खुल्या राष्ट्रीय स्पर्धेचे नाशिक येथील संभाजी स्टेडियम येथे झालेल्या स्पर्धेमध्ये महाराष्ट्रसह राजस्थान, हिमाचल प्रदेश, मध्यप्रदेश, उत्तरप्रदेश आदींसह 1200 खेळाडुंनी सहभाग नोंदविला. स्पर्धा रिंगवन व रिंग टु याप्रकारात घेण्यात आल्यात. स्पर्धेमध्ये पोलिस स्केटींग क्लबच्या खेळाडुंनी प्रशिक्षक विनोद अहीरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहभाग नोंदवून उत्कृष्ट कामगिरी करून घवघवीत यश संपादन केले. या स्पर्धेत सुवर्ण पदक- रोहित आवटे, देवेन सोनवणे, तोषण पाटील, ओम लोणे, तेजस चिंचणकर. रजत पदक – अनुष्का अहिरे, हर्षल पुरोहित, प्रितम बनसोडे, ललित जाधव, सत्यम पटेल, यश देसले, बालाजी कलंदर. कास्य पदक – कौशिक पाटील, शिवम हुजूरबाजार, भुमी अहिरे, साईराज पाटील, आर्यन अहिरे, चैतन्य मुंढे, साहिल तडवी, देवेंद्र बागुल, योगेश पाटील, कल्याणी पवार यांनी यश मिळविले.

खेळाडुंना खासदार हेमंत गोडसे यांच्या हस्ते मेडल्स देण्यात आली. सर्व विजेत्या खेळाडुंना पोलिस अधिक्षक दत्तात्रय कराळे यांनी आपले दालनात सत्कार करुन सर्वांचे अभिनंदन केले. अप्पर पोलिस अधिक्षक बच्चन सिंह, पोलिस उपअधिक्षक (गृह) रशिद तडवी, कार्यालय अधिक्षक एन. के. हडपे, पोलिस निरीक्षक श्रीकांत घुमरे आदी उपस्थित होते. टिम मॅनेजर म्हणुन राहुल पाठक, सह प्रशिक्षक नितीन चव्हाण, अमोल साळवे, राजेश इंगळे, बादलसिंग पाटील यांनी सहकार्य केले.