रेल्वे, मनपातील अधिकार्यांसह आमदारांकडून जागेची पाहणी ः ब्राम्हण सभेजवळील जागेची पाहणी करुन घेणार निर्णय
जळगाव : महापालिकेच्या हद्दीतील तहसील कार्यालयाजवळ स्कायवॉक, भोईटेनगर रेल्वेगटवरील आर्म (उड्डाणपूल), तर ब्राह्मण सभागृहाजवळील बोगद्याच्या मागणी संदर्भात शनिवारी सकाळी भुसावळ येथील रेल्वेच्या निर्माण विभागाचे उपमुख्य अभियंता दिपककुमार, सहायक अभियंता ए. के. नलावडे यांनी महापालिकेचे अधिकारी, आमदार यांच्यासह स्कायवॉक, पिंप्राळा उड्डाणपूल, रेल्वे बोगदाच्या प्रस्तावीत जागेची प्रत्यक्ष पाहणी केली. याबाबत रेल्वे प्रशासन सकारात्मक असून ब्राह्मण सभेजवळील जागेची पुन्हा रेल्वे अधिकारी पाहणी करून निर्णय घेणार आहे.
स्कायवॉक संदर्भात जागेचे मोजमाप
येथील महापालिकेच्या हद्दीतील रेल्वेबाबत असलेले प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी खासदार उन्मेश पाटील यांनी डीआरएम यांची भेट घेतली होती. त्यानुसार शनिवारी रेल्वेच्या अधिकारी, आमदार, मनपा पदाधिकारी व अधिकार्यांनी पाहणी केली. यावेळी रेल्वेच्या जळगाव विभागाचे सहायक अभियंता शशिकांत पाटील यांनी स्कायवॉक संदर्भात जागेचे मोजमाप करण्यात आले असून, यासाठी रेल्वेला कुठलिही अडचण येणार नसल्याचे रेल्वे अधिकार्यांनी सांगितले. यावेळी स्थायी समिती सभापती अॅड. शुचिता हाडा, नगरसेवक नवनाथ दारकुंडे, नगरसेविका सुनीता नेरकर, मनपाचे शहर अभियंता सुनिल भोळे व प्रकल्प अभियंता योगेश बोरोले उपस्थित होते.
पिंप्राळा आर्मफ उड्डाणपूल होणार
रेल्वे, मनपाचे पदाधिकारी भोईटेनगर रेल्वे गेटवरील पिंप्राळा उड्डाणपुलाची पाहणी केली. यावेळी रेल्वेचे अभियंता दिपक बोंडे यांनी माहिती देताना म्हणाले, की पिंप्राळा रस्त्यावर आर्मफ उभारण्यासाठी जागेचा अढथळा आहे. उड्डाणपुल उभारणीला विलंब होत आहे. यावेळी आमदार भोळेंनी महापालिका कमीत कमी भूसंपादन करून जागा करुन देईल. त्यानुसार नविन नकाशा तयार करावा असे महापालिकेचे अधिकार्यांनी रेल्वेच्या अधिकार्यांना सांगितले. रेल्वे नविन नकाशा तयार करणार असल्याचे सांगितले.
रेल्वे प्रशासनाने शिवाजीनगर उड्डाणपुलाचे काम सुरु असल्याने पर्यायी रस्ता म्हणून ब्राम्हण सभेजवळ भुयारी बोगदा उभाण्यासाठी परवानगी आहे. परंतू भुयारी बोगद्यासाठी येथील गटारींची अडचण येत आहे. या जागेची पून्हा रेल्वेचे अधिकारी जागेची पाहणी करणार आहे.
स्कायवॉकसाठी अंदाजपत्रक देणार
स्कॉयवॉकसाठीची पाहणी केल्यानंतर रेल्वेच्या अधिकार्यांसह, आमदार, मनपाचे पदाधिकारी व अधिकार्यांची बैठक झाली. यावेळी आमदार सुरेश भोळे, महापौर सिमा भोळे, नगरसेवक विशाल त्रिपाठी यांच्यासह बांधकाम विभागाचे सहायक अभियंता सौरभ तिवारी, उद्योजक आदित्य खटोड व नगररचना विभागाचे अभियंता होते. अतिथी कक्षात तासभर झालेल्या बैठकीत स्कायवॉकला अडचण नसून या कामासाठी लागणारा खर्चाचे सविस्तर अंदाजपत्रक लवकरत मनपाला दिले जाईल असे रेल्वेचे सहायक अभियंता पाटील यांनी सांगितले.