स्कॉर्पिओच्या धक्क्याने दुचाकीवरील दोघे जखमी

0

जळगाव । गावातील नातेवाईकांच्या भुसावळ येथे गेलेल्या पाळधी जवळी शेरी येथील दोन जणांचा घरी परतत असतांना बांभोरीजवळील गिरणा नदीच्या पुलावर स्कार्पिओच्या धक्क्याने मोटारसायकल खाली कोसळून दोघेजण गंभीर दुखापत झाल्याची घटना शुक्रवारी दुपारी 3.30 वाजेच्या सुमारास घडली असून दोघांना जिल्हा सामान्य रूग्णालयात दाखल करण्यात आले. मिळालेल्या माहितीनुसार, विकास साहेबराव पाटील (वय-32) व सलिम करीम पिंजारी (वय-27) दोन्ही रा. शेरी पाळधी ता. धरणगाव हे भुसावळ येथे गावातील ओळखीच्या व्यक्तीच्या लग्नासाठी मोटारसायकलने गेले होते. सलिम पिंजारी यांच्या डिस्कव्हर मोटारसायकल क्र.(एमएच 18 एएस 5361) ने घरी परतत आसतांना जळगाव सोडून बांभोरीजवळील पुलाच्या मध्यभागी आल्यानंतर मागून येणार्‍या अज्ञात स्कार्पिओने धडक दिल्याने मोटारसायकलवर असलेले विकास पाटील आणि सलिम पिंजारी दोघे गंभीर दुखापत झाली.

नातेवाईकांची धाव
हा अपघात दुपारी 3.30 ते 4 वाजेच्या दरम्यान झाला असून अपघातानंतर स्कॉपिओवरील अज्ञात वाहन चालक फरार झाला. एरंडोकडून जळगावकडे जाणार्‍या सर्व वाहनचालकांनी जखमींनी मदत करून खासगी गाडीत टाकून उपचारार्थ दाखल करण्यात आले. दोघांचा अपघात झाल्याचे कळाल्यानंतर नातेवाईकांनी जिल्हा सामान्य रूग्णालयात एकच धाव घेतली होती.