मानराज पार्कजवळील घटना
जळगाव । विना नंबरची रिक्षा पाळधीकडून जळगाव शहराकडे जात असतांना समोरून येणार्या अज्ञात स्कॉर्पीओने जोरदार धडक दिल्याने रिक्षा पलटी होवून रिक्षाचालकासह प्रवाशी चार महिला जखमी झाल्याची घटना आज सकाळी 11.30 वाजेच्या सुमारास मानराज पार्कजवळील पुलाच्या चढतीवर झाली. आपघात झाल्यानंतर अज्ञात स्कॉर्पीओ घटनास्थळाहून पसार झाला होता. अज्ञात स्कॉर्पीओच्या चालकाविरूद्ध गुन्हा नोंदविण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते. परीसरातील नागरीकांना घटनास्थळी धाव घेवून सदरी जखमी महिलांना बाहेर काढत मिळेल त्या खासगी वाहनाने जिल्हा सामान्य रूग्णालयाकडे उपचारार्थ रवाना करण्यात आले होते.
प्रत्यक्षदर्शींकडून मिळालेली माहिती अशी की, रिक्षा चालक दिपक सुनिल पाटील (30) रा.पाळधी यांनी नुकतेच नवीन रिक्षा घेतली. अजून रिक्षाला नंबर न मिळाल्याने त्यांनी प्रवाशी वाहतूक करण्यास सुरूवात केली होती. पाळधीहून प्रवाशी कल्पना हरचंद भोई, कमलाबाई शांताराम पाटील, सरला लक्ष्मण खैरनार, संगिता मश्चिंद्र पाटील सर्व रा. पाळधी यांना जळगाव शहराकडे जाण्यासाठी विनानंबरच्या रिक्षा पाळधी येथून बसले. पिंप्राळ्याजवळील मानराज पार्कजवळील रेल्वे पुलाच्या चढतीवर रिक्षा आली तेव्हा समोर अज्ञात स्कॉर्पिओ भरधाव वेगाने येवून कट मारला. रिक्षाला कट लागताच रिक्षा पलटी होवून नवजिवन सुपर शॉपच्या कडेला पडली. या रिक्षा चालकासह चौघी प्रवाशी महिला किरकोळ जखमी झाल्या. खासगी वाहनाने जखमींना जिल्हा सामान्य रूग्णालयात दाखल करण्यात आले.