ठाणे । महाराष्ट्र राज्य हौशी जलतरण संघटनेतर्फे धुळ्यातील महानगरपालिकेच्या तरणतलावात आयोजित केलेल्या 79 व्या कनिष्ठ वयोगटाच्या जलतरण स्पर्धेत स्टारफिश असोसिएशन क्लबच्या जलतरणपटूंनी चमकदार कामगिरी केली. सुवर्णपदक, रौप्यपदक व कांस्यपदकांची लयलूट करीत स्टारफिशच्या जलतरणपटूंनी या स्पर्धेत सांघिक विजेतेपद मिळवले.
याशिवाय वॉटरपोलो स्पर्धेत स्टारफिश क्लबच्या महिला संघाने जळगावचा पराभव करत सुवर्णपदक मिळवले, तर पुरुष संघाला मात्र उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. नील वैद्य याने दोन सुवर्ण, तीन रौप्य व कांस्य, आदित्य घाग याने चार सुवर्ण, दोन रौप्य, एक कांस्य, वरद कोळी याने दोन रौप्य, एक कांस्य, सिध्दांत पोळ याने एक रौप्य व एक कांस्य, यश सोनक याने पाच सुवर्ण, पाच रौप्य, तीन कांस्य, सानिका तापकीर हिने सहा सुवर्ण, पाच रौप्य, चार कांस्यपदक, ऋतुजा पोळ हिने एक सुवर्ण, एक कांस्य, शुभम पवार याने तीन रौप्य, चार कांस्य, जय एकबोटे याने अकरा सुवर्ण, दोन रौप्य, सवर आकुसकर हिने नऊ सुवर्ण, मानव मोरे याने एक रौप्य, ओम जोंधळे याने एक रौप्य, पृथ्वीराज कांबळे याने एक रौप्य, मयूरेश धावडे याने एक रौप्य, एक कांस्य, निष्ठा शेट्टी हिने तीन सुवर्ण, एक रौप्य, आयुषी आखाडे हिने एक सुवर्ण, तीन रौप्य, मीर विरा याने एक रौप्य, रियान नरोटे याने चार सुवर्ण, प्राश्मी गाला हिने दोन कांस्य, गौरी नाखवा हिने एक सुवर्ण, एक कांस्य पदक तर शांता आखाडे यांनी एक सुवर्णपदक पटकावले.आदित्य घाग, जय एकबोटे, सवर आकुसकर, निष्ठा शेट्टी, रियान नरोटे यांनी स्पर्धेत वैयक्तिक चॅम्पियनशिप पटकावली.