इंजिनियरिंग एक्स्पोर्ट प्रमोशन कौन्सिल (इइपीसी इंडीया)तर्फे पुरस्काराचे वितरण
जळगाव – इंजिनियरिंग एक्स्पोर्ट प्रमोशन कौन्सिल (इइपीसी) व्दारे दिल्या जाणाऱ्या ‘स्टार परफॉर्मर 2016-17’ या पुरस्काराने जैन इरिगेशनचा गौरव करण्यात आला. मुंबई येथे हॉटेल ताज महल पॅलेस येथे झालेल्या सोहळ्यात हा पुरस्कार राज्याचे अर्थ व नियोजन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याहस्ते जैन इरिगेशनचे वरिष्ठ व्यवस्थापक बबनराव मिसाळ (संशोधन आणि विकास) यांनी स्वीकारला.
या पुरस्काराचे 2016-17 या वर्षाकरीता इइपीसी इंडिया वेस्टर्न ॲवॉर्ड अंतर्गत वितरण करण्यात आले. हॉटेल ताज महल पॅलेस येथे रविवारी (ता. ३) झालेल्या या सोहळ्यास राज्यातील मान्यवरांची उपस्थिती होती. शेती आणि वनीकरणांच्या विकासात केलेल्या भरीव कामगिरीची दखल घेत जैन इरिगेशन कंपनीला गौरविण्यात आले. राज्याचे अर्थ व नियोजन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याहस्ते श्री. मिसाळ यांनी हा पुरस्कार स्वीकारला. प्रास्ताविक इइपीसी इंडियाचे अध्यक्ष के.एल. धिंगरा यांनी केले तर पुरस्काराबद्दलची माहिती इइपीसी इंडियाचे चेअरमन रवी सहगल यांनी दिली.