चाळीसगाव । स्टार फाउंडेशन परिवारतर्फे सालाबादाप्रमाने स्वातंत्र्यदिन व प.पु.लक्ष्मण चैतन्य जी बापू यांच्या जयंतीनिमित्त येथे रक्तदान शिबीर घेण्यात आले. शिबिराचे उद्घाटन माजी आमदार राजीवदादा देशमुख यांच्याहस्ते करण्यात आले. कार्यक्रमास रक्तदात्यांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
यांची होती उपस्थिती
याप्रसंगी श्याम चैतन्य महाराज जामनेरकर, सुभाष चव्हाण, स्टार फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ.तुषार राठोड, शतकवीर प्रा.दीपक शुक्ला, शुक्ला मॅडम, नगरसेवक भगवानबापू पाटील, रामचंद्रजी जाधव, जगदीश चौधरी, दीपक पाटील, सूर्यकांत ठाकुर, डॉ.संतोष राठोड, डॉ.संदीप देशमुख, सुभाषभाऊ जाधव, डॉ.सुनिल चौधरी, शेखर पाटील, खुशाल पाटील, ओंकार जाधव, कृष्णा सुर्यवंशी, विवेक पाटील, प्रीतेश पाटील, साहेबराव चव्हाण, जितेंद्र भोसले, आकाश पोळ, करण राजपूत, गणेश येवले, अक्षय पाटिल, मुन्ना राजपूत, राहुल माळे, चेतन जाधव आदी उपस्थित होते.