स्टार फुटबॉलपटू मेसीची तुरुंगवासाची शिक्षा कायम

0

बार्सिलोना । अर्जेंटिनाचा स्टार फुटबॉलपटू लिओनेल मेसीला स्पेनच्या करचुकवल्याच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाकडूनही दणका बसला आहे. मेस्सीला सुनाविण्यात आलेली 21 महिने तुरूंगवासाची शिक्षा स्पेनच्या सर्वोच्च न्यायालयाने कायम ठेवली आहे. मेस्सीसोबत त्याच्या वडिलांनाही स्पेनच्या सुप्रीम कोर्टाने करचुकवल्याच्या प्रकरणात तुरूंगवासाची शिक्षा सुनावली. भारतीय चलनानुसार त्याला जवळपास 14 कोटी, 50 लाख रूपये दंड ठोठावण्यात आला आहे.

मेसीसह वडिलांवरही आरोप
जगातील सर्वात महागड्या फुटबॉलपटूंमध्ये गणना होणा-या मेसी आणि त्याच्या वडिलांवर कर घोटाळयाचा आरोप आहे. मेसीने 40 लाख युरोचा कर भरण्याचे टाळून स्पेनची फसवणूक केली असा आरोप त्याच्यावर आहे. गेल्यावर्षी 6 जुलै रोजी कर चुकवेगिरीच्या तीन गुन्ह्यांमध्ये बार्सिलोनाच्या न्यायालयाने मेसी आणि त्याचे वडील जॉर्ज यांना दोषी ठरवले होते. न्यायालयाने दोघांना 21 महिने कारावासाची शिक्षा सुनावली होती. त्याचबरोबर मेसीला 20 लाख युरोचा दंडही ठोठावला होता. मेसीने या शिक्षेविरोधात स्पेनच्या सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. मात्र, आज झालेल्या सुनावणीत स्पेनच्या सर्वोच्च न्यायालयाने मेसीची शिक्षा कायम ठेवली आहे. मात्र ही शिक्षा रद्द होण्याचीही शक्यता वर्तविण्यात येत आहे. प्रथमच अहिंसात्मक गुन्ह्यत दोषी आढळणार्‍या व्यक्तीची शिक्षा रद्द होण्याचा नियम स्पेनमध्ये आहे. त्यामुळे मेस्सीला दिलासा मिळू शकतो.