न्यूयॉर्क : अमेरिकेतील प्रसिद्ध लेखक स्टीव्हन पेट्रोवला १९८४ मध्ये कॅन्सर झाला. त्याने उपचार सुरू केले. तो बराही झालाय. आज त्याला प्रश्न अनेक प्रश्न पडलेत. जॅक्वेलिन झिनने ग्लिओब्लास्टोमा प्रकारच्या कॅन्सरशी झगडण्यासाठी काहीही बाकी ठेवलं नाही. तरीही ती गेली. सिनेटर जॉन मॅककेन जीवघेणा ग्लिओब्लास्टोमा ब्रेन ट्यूमर झाला तरी जगला कसा. डोक्यात विचारांचे काहूर उठले आणि त्याने न्यूयॉर्कमधल्या न्यूरोसर्जन असलेल्या रामकृष्णांनी त्याला सत्य सांगितलं.
स्टीव्हनला मॅककेन ठाऊक होता. तीस वर्षे अमेरिकी सिनेटचा तो सदस्य होता. व्हिएतनामचा युद्धकैदी असतानाचे त्याला कॅन्सरने गाठले. पण त्याने कॅन्सरला धोबीपछाड केलं. तेव्हापासून कॅन्सरला हारविण्यासाठी योद्धा हवा ही थिअरी पुढे आली. सर्वाधिक खपाचं गेटिंग वेल सुन हे पुस्तकही स्टीव्हनला हेच सांगत होत की, व्यक्तीमत्वावर कॅन्सरशी संघर्ष अवलंबून असतो. द टाईप सी कनेक्शन बिहेविअरल लिंक्स टू कॅन्सर अँड युवर हेल्थ या पुस्तकातही तसंच प्रतिपादन. नम्र लोकांना आनंद देणारा कॅन्सरशी दोन हात करू शकतो की योद्धा, हा प्रश्न कायमच राहिला. स्टीव्हनने संपर्क साधलेले रोहन रामकृष्ण हे न्यूयॉर्कस्थित न्यूरोसर्जन आहेत. ब्रेन ट्यूमरवर त्यांचा गाढा अभ्यास आहे. त्यांच्या मते कॅन्सरसाठी खंबीर मन हवे, योद्ध्यासारखी मनोवृत्ती हवी हे खोटं आहे. तुमचा उपचारांना प्रतिसाद जीवशास्त्रीय असतो मानसशास्त्रीय नसतो, असे त्यांना वाटते.
कॅन्सरग्रस्त मॅककेनला त्याच्या कुटुंबाची साथ होती. त्याला कॅन्सरसाठी अमेरिकेतील सर्वोत्तम एरिझोनातील मेयो हॉस्पिटलमध्ये उपचार मिळत होते. तो अमेरिकी काँग्रेसचा सदस्य असल्याने वेगळ्या आरोग्य सुविधांच्या तरतुदीचा फायदाही त्याला मिळाला. लोक कॅन्सरसंदर्भात योद्धा या उपमेचा वापर करतात. ती संकल्पना जोडतात. त्यांचा उद्देश वाईट नसतो. पण पेशंट दगावला तर आमच्या उपचारांचं अपयश असतं असं रामकृष्ण स्पष्टपणे सांगतात.
जॅक्वीला पुन्हा कॅन्सर झाला. यावेळी तो ग्लिओब्लास्टोमा म्हणून तिच्या वाट्याला आला. तिने खूप खंबीरपणे ते स्वीकारले. स्वतःची क्रेडिट कार्ड रद्द केली, तिचे चांगले चांगले कपडे वाटून दिले, मुलांना समजावले, तिच्या अंतयात्रेचीही नियोजन केले. ती खंबीर होती तरी तिचा संघर्ष यशस्वी झाला नाही. स्टीफन पेट्रोव्ह हे सांगतो तेव्हा त्याला रामकृष्ण यांची आठवण येते. कॅन्सरसाठी चांगले उपचारच हवेत. नुसतं मनाला डोस देण्याचं हे काम नाही, हे त्याला आज पटलंय.