चाळीसगाव : चाळीसगाव शहरातील तहसील कार्यालयामागे असलेल्या एका स्टॅम्प वेंडरने उत्पनाच्या दाखल्यासाठी अनधिकृतपणे 3 हजार रुपयाची मागणी केल्याने प्रांताधिकारी व तहसीलदार यांनी सदर अनधिकृत टपर्या (अतिक्रमण) काढण्याची प्रक्रिया बुधवार 5 जुलै 2017 रोजी सायंकाळी सुरु केली असून 2 टपर्या काढल्यानंतर 1 दिवसाच्या मुदतीवर हि कारवाई तात्पुरती थांबवण्यात आली आहे.
उत्पन्नाचा दाखल काढण्यासाठी एक युवकाकडून अनधिकृत स्टॅम्प वेंडर ने 3 हजार रुपये घेऊन देखील त्याला दाखला न मिळाल्याने त्या युवकाने सदर बाब प्रांताधिकारी व तहसीलदार यांच्याकडे सांगून याबाबत युवकाने पोलिसात तक्रार केली होती. याचा फटका सर्व स्टॅम्प वेंडरांना बसला असून प्रांताधिकारी व तहसीलदार यांच्या आदेशावरून सदर अतिक्रमित व अनाधिकृत काही टपर्या काढण्यासाठी नायब तहसीलदार विशाल सोनवणे हे 5 जुलै 2017 रोजी सायंकाळी जेसीबी सह महसूल कर्मचारी व वीज वितरण कंपनीच्या कर्मचार्यांसह दाखल झाले. त्यांनी सदर टपर्या त्यातील अधिकृत वगळता काढण्यासाठी सुरुवात केली त्यात 2 टपर्या काढल्यानंतर सर्व स्टॅम्प वेंडरांनी 1 दिवसात आम्ही आमच्या टपर्या काढून घेतो अशी विनंती केल्यावरून एक दिवसासाठी हि प्रक्रिया थांबवण्यात आली आहे.