जळगाव। नेहमी प्रमाणे दिवाणी न्यायालयातील कर्मचारी स्टेट बँकेत पैश्याचा भरणा करण्यासाठी गेले होते.त्यावेळी भरणा करणार्या काऊन्टरजवळ पैसे भरणा उभे असतांना एका अज्ञात व्यक्तीने सांगितले की, तुमचे पैसे पडले.पैसे उचलण्यासाठी वाकले असता दुसर्या व्यक्तीने भरण्यासाठी आणलेली न्यायालयाची रक्कम 93 हजार 330 रूपये घेवून ते दोन्ही अज्ञात व्यक्ती क्षणात पसार झाले.आराडा आरेड केल्यानंतरही ते व्यक्ती मिळून आले नाही.याप्रकरणी जिल्हापेठ पोलिसात दोन अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. स्टेट बँक मुख्य शाखेत असलेल्या सीसीटिव्ही फुटेजमध्ये ते दोन अज्ञात व्यक्ती दिसुन आले आहे.
भरणासाठी आले कर्मचारी : जिल्हा व सत्र न्यायालयामधील चलनाची रक्कम भरणा करण्यासाठी 18 रोजी न्यायालयाचे वरीष्ठ स्तर बेलीफ रामचंद्र सिताराम घोडके व शरद सुकदेव पाचपोळ सकाळी 11 वाजेला नेहमी प्रमाणे चलनाची रक्कम भरणा करण्यासाठी स्टेट बँकेच्या मुख्य शाखेत निघाले. 11.30 वाजेला स्टेट बँकेच्या मुख्य शाखेत पोहचले. यावेळी चलन क्रमांक 169 रक्कम 3762,चलन क्रमांक170- 5000, चलन क्रमांक 171 -3000,चलन क्रमांक रक्कम 20 हजार 900, मुख्य न्यायदंडाधिकारी न्यायालय जळगाव चलन क्रमांक 284 रक्कम 20 हजार 700, चलन क्रमांक 285 रक्कम 2000, चलन क्रमांक 286 रक्कम 6 हजार 850, चलन क्रमांक 287 रक्कम 3 हजार 218 रूपये एकुण 32 हजार 768 रूपये,न्यायदंडाधिकारी प्रथम श्रेणी दुसरे न्यायालय जळगाव चलन क्रमांक 67 रक्कम 900, अशी एकत्रीत रक्कम 93 हजार 330 रूपये घेवून भरणा केला.
पैसे खाली पडले सांगून रोकड लांबविलीः सदर रक्कम ही जिल्हा व सत्र न्यायालयाची रक्कम काळ्या रंगाच्या बॅगेत 10 व 20 रूपयाची नाणे ठेवले होते. 93 हजार 130 रूपये हे नोटांचे बंडल करून न्यायालयाने दिलेल्या चलनामध्ये ठेवले होते.भरणा करण्यासाठी बँकेच्या भरणा काऊन्टर 7 वर रांगेत उभे राहिले.भरणा करण्यासाठी नंबर आल्यावर पैसे भरणा काऊन्टर ठेवले.त्यावेळी घोडके हे भरणा करण्यासाठी पैसे ठेवत असतांना त्याच्या शेजारी दोन व्यक्ती फिरत होते.त्या दोघांमधील बदामी रंगाचे हा हाफ शर्ट व निळ्यारंगाचा जिन्स पॅन्ट घातलेल्या जाडजुड ईसमाने सांगितले की, तुमचे पैसे खाली पडले. त्यामुळे वाकुन पाहिले असता पायाजवळ दहा रूपयांच्या चार नोटा पडलेल्या दिसल्या घोडगे यांना वाटले की भरण्यातील पैसे पडले.त्या नोटा उचण्यासाठी वाकले असता डाव्या बाजुला उभा असलेल्या मजबुत शरीराच्या व्यक्ती ज्याने आकाशी शर्ट व काळा फुल पॅन्ट घालेतल्या व्यक्तीने चलनामध्ये गुंडाळलेली सरकारी रक्कम घषवून पसार झाले. त्यावेळी पैसे खाली पडले सांगणार व्यक्ती सुध्दा तेथुन पळत निघुन गेला. सोबत असलेल्या पाचपोळ यांनी आराडा ओरड करूनही त्यांना पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र ते अज्ञात व्यक्ती बँकेतुन पसार झाले.
सीसीटीव्ही तपासले
2000 रूपयाच्या 32 नोटा – 64000, 500 रूपयाच्या 28 नोटा – 14000, 100 रूपयाच्या 92 नोटा – 9200, 50 रूपयाच्या 110 नोटा -5500, 20 रूपयाच्या 7 नोटा – 140 , 10 रूपयाच्या 29 नोटा -290 असे एकुण 93130 चोरीला गेली. याप्रकरणी रामचंद्र घोडके व पाचपोळ घटना झाल्याबरोबर बॅकेच्या मॅनेजर याच्याकडे गेले सदरची घटना सांगितली. मॅनेजर यांनी तात्काळ पोलिसांना पाचारण केले.पोलिसांनी घटना कशी याची पाहणी केली. बॅकेत असलेल्या सीसीटिव्हीची तपासाणी केली असता त्यावेळेस दोन अज्ञात व्यक्ती त्याठिकाणी होते.याप्रकरणी जिल्हा पेठ पोलिसात रामचंद्र सिताराम घोडके याच्या फिर्यादीवरून गुन्हा नोंद करण्यात आला आहे.