नवी दिल्ली । देशातील सर्वात मोठी बँक असलेल्या एसबीआय म्हणजेच स्टेट बँक ऑफ इंडियाने बचत खात्यामध्ये किमान शिल्लक ठेवण्याची मर्यादा निश्चित केली आहे. नव्या नियमांनुसार खात्यात मासिक इतकी रक्कम न ठेवल्यास ग्राहकांना मोठा फटका बसणार आहे. ग्राहकांना दंडही भरावा लागणार आहे. याआधी स्टेट बँकेने खात्यातील किमान रकमेची मर्यादा हटवली होती. त्यामुळे शून्य रुपयांमध्येही बचत खातेधारकांना आपलं अकाऊंट वापरता येत होते. मात्र, एप्रिल महिन्यापासून स्टेट बँकेने ही मर्यादा पुन्हा ठेवली आहे.
बँकेने ग्रामीण, निमशहरी आणि शहरी भागानुसार किमान रकमेची मर्यादा ठेवली आहे. दंडाची रक्कमही त्याच पटीत खात्यातून वळती केली जाणार आहे. ही किमान रक्कम खात्यात न बाळगल्यास खातेधारकांना दंडही भरावा लागणार आहे. हा दंड खात्यातून वळता केला जाईल. ग्रामीण भागातील खातेदारांना आपल्या खात्यात किमान 1000 रुपये, निमशहरी भागातील ग्राहकांना 2000 रुपये, शहरी भागातील ग्राहकांना 3000 रुपये तर महानगरातील ग्राहकांना किमान 5000 रुपये रक्कम खात्यात ठेवावी लागेल.
1000 रुपयांच्या खाली शिल्लक आल्यास इतका दंड
500 ते 1000 शिल्लक
20 रुपयांचा दंड
250 ते 500 शिल्लक
30 रुपयांचा दंड
0 ते 250 शिल्लक 50 रुपयांचा दंड
निम शहरी दंडाची रक्कम
1000 ते 2000 शिल्लक 25 रुपयांचा दंड
500 ते 1000 शिल्लक 50 रुपयांचा दंड
0 ते 499 शिल्लक 75 रुपयांचा दंड
शहरी दंडाची रक्कम
1500 ते 3000 शिल्लक 40 रुपयांचा दंड
750 ते 1500 शिल्लक 60 रुपयांचा दंड
0 ते 749 शिल्लक 80 रुपयांचा दंड
महानगरीय भाग दंडाची रक्कम
2500 ते 5000 शिल्लक 50 रुपयांचा दंड
1250 ते 2500 शिल्लक 75 रुपयांचा दंड
0 ते 1249 शिल्लक 100 रुपयांचा दंड