स्टेरलाईट प्रकल्प बंदीसाठी प्रयत्न-पनीरसेल्वम

0

थुथूकुडी – थुथूकुडी येथील स्टेरलाईट कॉपर प्रकल्प बंद करण्यासाठी सरकार योग्य ती पावले उचलेल असे तमिळनाडूचे उपमुख्यमंत्री ओ. पनीरसेल्वम यांनी सोमवारी सांगितले. जखमींची भेट घेण्यासाठी पनीरसेल्वम यांनी येथील रुगण्लायाला भेट दिली.

२२ मे रोजी अॅन्टीस्टेरलाईट प्रोटेस्टमध्ये १३ जणांचा मृत्यू झाला होता. दरम्यान खंडीत करण्यात आलेली इंटरनेट सेवा पुन्हा सुरू करण्यात आली आहे. गावातील दुकाने आता उघडत असून परिस्थिती पूर्वपदावर येत आहे, अशी माहिती एस.राजा यांनी दिली. गोळीबार करणाऱ्या पोलिसांवरविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.