खेड : खेड तालुक्रातील पिंपरी बु्द्रुक गावातील लादवड वस्तीनजिक असणार्रा स्टोन क्रशरमुळे सामान्य जनतेचे जनजीवन धोक्यात आले आहे. हे स्टोन क्रशर बंद करण्याची मागणी सेंटर फॉर गुड गर्व्हनन्स संस्थेच्या वतीने तहसिलदार सुनील जोशी यांच्याकडे केली होती. जोशी रांनी स्टोन क्रशन बंद करण्याचे पत्रक काढून तसे आश्वासन दिले होते. परंतु त्यांच्या पत्रकानुसार आणि आश्वासनानुसार क्रशर बंद करण्यात आले नसून ग्रामस्थांची फसवणूक केल्याने नागरिकांकडून संताप व्यक्त आहे. आठ दिवसात दगडखाणी बंद केल्या नाहीत तर उच्च न्यायालयात दाद मागणार असल्याच्या वतीने कळविण्यात आले आहे.
ब्लास्ट करून खनिज उत्खनन
जऊळके गावातील लादवड वस्ती रेथील दोन दगड खाणीमध्रे सुरू असलेले स्टोन क्रशर बंद करण्याची मागणी ग्रामस्थांनी केले होती. ग्रामस्थांच्या मागणीनुसार तहसिलदार सुनील जोशी रांनी 6 एप्रिल रोजी दोन्ही दगडखाणी बंद करण्याचे पत्रक काढले होते. परंतु पत्रक काढूनही जोशी रांनी कारवाई केली नाही. रा दगड खाणींमुळे व वेळी अवेळी करण्यात येणाऱ्या ब्लास्टमुळे रेथील नागरिकांचे जनजीवन धोक्यात आले आहे. रामुळे तहसिलदारांनी खाणमालक, स्थानिक नागरिक व प्रशासनाची एकत्र बैठक घेऊन नागरिकांना त्रास होऊ नरे म्हणून दक्षता घेण्याची सूचना केली होती. राकडे खाणमालकांनी दुर्लक्ष केले असून अद्यापही रा ठिकाणी खाणीमध्ये ब्लास्ट करून खनीज उत्खनन सुरू आहे. हे ताबडतोब थांबवावे अन्यथा राबाबत उच्च न्रारालरात दाद मागण्याचा इशारा सेंटर फॉर गुड गर्व्हनन्सचे विवेक भूजबळ रांनी दिला आहे.
घरांना तडे, आरोग्यांचाही प्रश्न गंभीर
पिंपरी बुद्रुक गावातील नागरिकांसाठी लादवड वस्ती नजीक एकमेव पाझर तलाव आहे. मागील कालावधीत वर्षभर या पाझर तलावाला मुबलक पाणी असारचे मात्र खाणीतील ब्लास्टमुळे या पाझर तलावाची व परिसरातील विहिरींच्या पाण्याची नवीन बांधकामांना स्फोटकाच्या तडे गेले आहेत. शिरोली-पाईट रस्त्यालगतच या खाणी असल्यामुळे या मार्गावरून प्रवास करणार्रा नागरिकांचा जीव धोक्यात आला आहे. हा परिसर डोंगरभागात असल्यामुळे ब्लास्टमुळे निर्माण होणारी धूळ, खडी, खच हवेमध्ये व यामुळे हवेतील धुलीकणाचे प्रमाण वाढले आहे. जनावरांच्या चार्यावर, शेतातील पिकांवर धूलिकण वाढल्यामुळे चारा खाण्यास योग्य असून शेतमालाचे देखील लाखो रुपरांचे नुकसान होत आहे.