कजगाव । येथील माध्यमिक शाळेत अकरावीत शिकणार्या मुलीला स्टोव्हच्या भडक्याने अंगावरील कपड्याने पेट घेतला. तत्काळ ग्रामीण रूग्णालयात उपचारार्थ दाखल केले असता वैद्यकिय अधिकारी यांनी युवतीला मृत घोषीत केले. मिळालेल्या माहितीनुसार नम्रता देवीदास भोई (वय-17) अल्पवयीन मुलगी 10 रोजी सकाळी 7.30 वाजता राहत्या घरी आंघोळीसाठी गरम पाणी तापवण्यासाठी स्टोव्हवर पाणी ठेवले असता त्याच दरम्यान स्टोव्हने अचानक भडका घेतल्याने तीच्या अंगावरील कपड्याने लगेचचे पेट घेतला. या आगीत मुलगी गंभीररित्या भाजली गेल्याने तीला उपचारासाठी ग्रामीण रूग्णालयात दाखल केले. तीला वैद्यकिय अधिकार्यांनी मृत घोषीत केले. या घटनेबाबत भडगाव पोलिसात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोहेकॉ सोनवणे करित आहे. तीच्या पश्चात आई, वडील, बहिण व भाऊ आहे. ती देविदास ओंकार भोई यांची मुलगी आहे. तरूण मुलगी अचानक गेल्याने परिसरात एकच हळहळ व्यक्त होत आहे.